A 35-year-old woman was molested in Bhusawal taluka भुसावळ : तालुक्यातील वरणगाव परीसरातील 35 वर्षीय विधवा महिलेचा रस्ता अडवत एकाने विनयभंग केला. ही घटना गुरुवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी युवराज गणपत पवार (भुसावळ तालुका) याच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रस्ता अडवत लज्जास्पद वर्तन
वरणगावतील परीसरातील एका गावातील 35 वर्षीय विधवा महिला गुरुवार, 6 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास खालच्या गावातून किराणा सामान घेत घरी येत असताना आरोपी युवराज गणपत पवार याने महिलेसोबत अश्लील संवाद साधला. पीडीत महिलेने विरोध केला असता तिच्या घरी जात संशयीत आरोपी युवराज पवार याने पीडीतेला शिवीगाळ करीत मारहाण करीत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पीडीतेने वरणगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर गुरुवारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.