जळगाव: वर्षभरात रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत शेकडो लोकांची फसवणूक करून चतुर्भुज झालेल्या जारगावच्या विनोद हिलाल पाटील (46) यास पाचोरा पोलिसांनी अटक केली. गुजरातमधील जामनगर पोलिसांनी त्यास एका गुन्ह्यात अटक केली हेाती. पाचोरा पोलिसांनी ट्रान्सपर वॉरंटद्वारे त्याचा ताबा घेतला तर न्यायालयाने त्यास सात दिवसांची कोठडी सुनावली. आरोपीने दहा वर्षांपूर्वी दिव्यजीवन डिव्हाईन लाईफ नावाची संस्था उघडून तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल आहे.