35 वर्षीय महिलेवर चाकूच्या धाकावर अत्याचार : जामनेर तालुक्यातील घटना

पहूर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून संशयीताने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गणेश भागवत मोहिते (32) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

चाकू दाखवून अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात 35 वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. गावातील गणेश भागवत मोहिते याने शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी रात्री 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान महिलेच्या घराच्या खिडकीतून प्रवेश केला. संशयीत आरोपी गणेश मोहितेने महिलेला चाकूचा धाक दाखवत घराच्या खिडकीतून बाहेर ओढत नेले व घराच्या बाजूच्या बांधकाम चालू असलेल्या घराच्या रूममध्ये नेत मारहाण करीत अत्याचार केला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी गणेश भागवत मोहिते (32) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी भारत काकडे करीत आहे.