35 हजारांचे सागवानी लाकूड जप्त

0

यावल – वाघझिरा गावाजवळील नाल्याच्या काठी लपवून ठेवलेले 35 हजार रुपये किंमतीचे सागवानी लाकूड यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 15 रोजी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी मात्र मिळून आले नाही. गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनरक्षक एस.एस.माळी, जगदीश ठाकरे, संदीप पंडीत, वाहनचालक योगीराज तेली यांनी ही कारवाई केली.