अमळनेर । राष्ट्रीय ऊर्जा बचत कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मंगरूळ येथे शिरपूर पॉवर प्लांटतर्फे ग्रामपंचायतीला प्रांताधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते 350 एल.ई.डी दिवे मोफत वाटप करण्यात आले. मंगरूळ येथील गरीब, आर्थिक दुर्बल, कामगारांना ग्रामपंचायतीतर्फे हे दिवे मोफत वाटण्यात येतील सरपंच अनिल अंबर पाटील यांना हे दिवे सुपूर्द करण्यात आले. त्याच प्रमाणे इंदिरा नगर भागात महिलांच्या सार्वजनिक शौचालयांच्या प्रांगणात 2 ते 3 वर्षे वयाची निंबाची झाडे लावण्यात आली तसेच प्रांताधिकार्यांनी जलयुक्त शिवार योजनेतील गाव तळ्याची पाहणी केली शिरुड रस्त्यावर गाव तळ्यात जनावरे आणि महिलांना कपडे धुण्यासाठी बोअरचे पाणी सोडले जात आहे , याचं तळ्यात मासेमारीचा व्यवसाय केला जातो ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्न मिळत असते. या कार्यक्रमास शिरपूर पॉवर प्लांट चे व्हॉ प्रेसिडेंट अतुल गर, माजी उपअधिक्षक भास्करराव पगार, वरिष्ठ व्यवस्थापक युवराज पगार, व्यवस्थापक विकास शिंगाडे , ग्रामसेवक सुकलाल मालते, तलाठी मनोहर भावसार, पोलीस पाटील भागवत पाटील, रंगराव बागुल, अमोल पाटील, गोरख पाटील, निलेश बागुल, संतोष पाटील, विठ्ठल पाटील, धनराज पाटील, रामकृष्ण वाणी यांच्यासह ग्रामस्थ हजर होते. सूत्र संचालन संजय पाटील यांनी केले