350 रूग्णांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी

0

मुक्ताईनगर । येथील शिवचरण उज्जैनकर व मुक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात 350 रूग्णांची विविध आजारांसंदर्भात तपासणी करण्यात आली. कुर्‍हाकाकोडा येथील खडके इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शिबिरात हृदयरोग, डायबिटीज, टीबी, दमा, पॅरालिसीस, किडनी, कॅन्सर अशा विविध आजारांविषयी हृदयरोगतज्ञ डॉ. एन.जी.मराठे, किडनीतज्ञ डॉ.सदानंद भुसारी, कॅन्सरतज्ञ डॉ.नीलेश चांडक, डॉ.अतुल साळवे, डॉ.प्रमोद जैन, डॉ.उमेश गांधी, डॉ.अर्जुन साठे, डॉ.प्रेमचंद तायडे, डॉ.राहुल ठाकोर, डॉ.योगेश पाटील आदींनी तपासणी केली.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
शिबिराच्या अध्यक्षस्थानी माधवराव गोळवलकर सार्वजनिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिवलकर होते. उद्घाटन पंचायत समिती माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी कुर्‍हा सरपंच डॉ. बी.सी.महाजन, उपसरपंच अनिल पांडे, पांडुरंग राठोड, पंकज पांडव आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी भेट देवून रूग्ण व डॉक्टरांशी संवाद साधला. प्रास्ताविक व आभार उज्जैनकर फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी केले. यावेळी 140 रूग्ण तपासून त्यापैकी 20 रूग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथे पाठवण्यात आले तर हृदयविकाराच्या 19 रूग्णांचे ईसीजी काढण्यात आले. स्त्री रूग्णांचे 29, किडनी विकार 28, कॅन्सर 12 व इतर 151 रूग्णांची तपासणी करण्यात आली.