सावदा (प्रतिनिधी) – सावदा पो.स्टे. हद्दीतील व शहरापासून जवळ असलेल्या वाघोदा बुद्रुक गाव जवळ अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सावदा पोलीसांनी छापा टाकून कारवाई करत ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३५ हजार ७०० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यात वाघोदा बुद्रुक गावाजवळ असलेल्या मस्कावद रोडलगत झाडाजवळ अवैधरित्या जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती सावदा पोलीसांना मिळाली. त्यानुसार सावदा पोलीसांनी शनिवारी २७ मे रोजी दुपारी ३ वाजता छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलीसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य असा एकुण ३५ हजार ७०० रूपयांची मुद्देमाल हस्तगत केला
तर यात जुगार खेळणाऱ्या धनराज राजेंद्र पाटील, अनवर उर्फ फिराज सरवर पटेल, साबीर सिकंदर पटेल, विनोद काशिनाथ कोळी, सुभाष मुरलीधर पाटील, अरविंद उर्फ दिपक रमेश पाटील, सुभाष धोंडू चौधरी, शाहरूख सिकंदर पटेल, उमेश पंडीत कोळी, अनिल रसुल पटेल, सर्व रा. वाघोदा बुद्रुक ता. रावेर, काशिनाथ घावा, कोरोशिया रा. मेहतर कॉलनी, सावदा ता. रावेर, अश्या 11 जणांवर यांच्यावर पो. कॉ. विनोद दामोदर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय पोहेकर करीत आहे.
सदर कारवाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक जलिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडूरंग सपकाळे, पोहेकॉ विजय पोहेकर, पोहेकॉ संजीव चौधरी, पो.ना. अक्षय हिरोळे, पो.ना. यशवंत टहाकळे, पो.कॉ. विनाद दामोदर आदींनी केली.