मुंबई । भारताचा सिक्सर किंग व कॅन्सरसारख्या आजाराव ज्याने विजय मिळविला आहे.तो भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंह हा क्रिकेटर बनण्यापुर्वी एका चित्रपटात अभिनय केला आहे. युवराजने लहान असताना अभिनेता आणि गायक हंसराज हंस यांच्यासोबत पंजाबी चित्रपट ‘मेहंदी शगना दी’ काम केले होते.1992मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. युवराजचे वय त्यावेळी 11 वर्ष होता. फिल्म हिस्ट्री पिक्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवर युवराजने काम केलेल्या चित्रपटातील फोटो शेअर केले आहेत.सिक्सर किंग म्हणून प्रसिध्द असलेल्या युवराजने नुकतेच आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत 300 वनडे खेळण्याचे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे.