कोळंबे विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

0

मुक्ताईनगर । तु.ल. कोळंबे विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांचा गुण गौरव व विविध कला गुणाचा अविष्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी.एस. चौधरी पंचायत समिती सभापती राजु माळी, पुरुषोत्तम महाजन, नारायण चौधरी, रमेश खाचणे, चंद्रशेखर बढे, एन.ओ. खडसे व मुख्याध्यापिका वंदना भालशंकर यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवंराच्या हस्ते पारीतोषीक देवून करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष डॉ. सी.एस. चौधरी यांनी आपल्या भाषणात लहान मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष मोतीलाल जोगी व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.