भामेर । निजामपुर येथील म्हसाईमाता महिला पतसंस्था या संस्थेचा 14 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यवसायीक धर्मराज चिंचोले यांनी सपत्नीक सत्यनारायणाची महापुजा केली. वर्धापनदिनाचे औचित्य साधुन पतसंस्थेतर्फे डी.एस.राणे नगर, आदिनाथ नगर, विष्णुनगर आदि कॉलनी परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा बँक संचालक हर्षवर्धन दहीते व पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांतभाई शाह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीसदस्य वासुदेव वाणी, ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, प्रमोदभाई शाह, सुमंतभाई शाह, पत्रकार रघुविर खारकर, खुदाबक्ष शेख, दुल्लभ माळी, ललीत आरूजा, अबुशेठ पिंजारी, पतसंस्थेच्या चेअरमन उर्मीलाबेन शाह, संचालीका योगिता शाह, भिकनलाल जयस्वाल, निलेश जयस्वाल, मनोज भागवत शिंदे व अनेक सभासद पस्थित होते. यशस्वितेसाठी नारायण मोरे, जितेंद्र जाधव, जितु सोनवणे, चुनिलाल सोनवणे यांनी कामकाज पाहिले.