ठाणे । ठाणे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनीती ठरविण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रचाराची विविध तंत्रे वापरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. ठाण्यातील निवडणुकांच्या इतिहासात सेंट्रल मैदानाला विशेष महत्त्व आहे. निवडणुकांचा आखाडा म्हणून ओळखल्या जाणार्या ठाणेच्या सेंट्रल मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या भव्य सभा या मैदानावर झाल्या आहेत.त्याच मौदानावर जाहिर सभा घेण्याचा राजकीय पक्षांचा अ्राग्रह यंदा मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सभेसाठी मैदान मिळावे यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने मैदाने व्यवस्थापनाकडे अर्जही केले. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी मैदान देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायलयाने दिल्याने जाहीर सभांसाठी मैदान द्यायचे नाही असे व्यवस्थापनाने ठरविले आहे.
न्यायालयातून परवानगी मिळवा
देशातील आणि राज्यातील बडया नेत्यांच्या सभांमुळे सेंट्रल मैदानाला निवडणुकीचा आखाडा म्हणून ओळखले जाते. यंदा हा आखाडा शांतच राहील असे चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर सभांसाठी मैदान मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. सेंट्रल मैदान क्रिकेट खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी देऊ नये असे आदेश उच्च न्यायालयाने दीड वर्षांपूर्वी दिले आहेत. या आदेशाच्या पाश्वभूमीवर जाहीर सभांसाठी मैदान द्यायचे नाही, असा निर्णय व्यवस्थापनाच्या बैठकीत झाला आहे. राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयातून सभा घेण्यासंबंधीचे आदेश मिळविले तर त्यांना मैदान सभेसाठी खुले करून देण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे त्यांनी सांगितले.
बाळकुमच्या हायलॅण्ड गार्डन मैदानात होऊ शकतात सभा; मुख्य चौकांचाही सभा घेण्यासाठी पर्याय
ठाण्यात मैदाने शिल्लक नाही जी मैदाने आहे ती मोठी नाहीत. जांभळी नाका येथील शिवाजी मैदान छोटे असून गावदेवीतील मैदान शांतता क्षेत्रात येते, त्यामुळे येथे सभा होणे शक्य नाही.त्यातच सेट्रल मैदानातही सभेला परवानगी मिळणार नसल्याने नेत्यांच्या सभा घेणार कुठे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बाळकुमच्या हायलॅण्ड गार्डन मैदानात सभा होवू शकतो. मात्र ते शहराच्या मध्यवर्ती भागात नाही. त्यामुळे नेत्यांना शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरील मुख्य चौकांमध्ये राजकीय पक्षांना सभा घेण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे अशा सभाझाल्यास याभागात वाहनामुळे कोडी होते.त्यामध्ये अधिक बोजवारा उडण्याची भिती व्यक्त होत आहे.
शिवसेनेला हवे मैदान
प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना बडया नेत्यांच्या जाहीर सभा सेंट्रल मैदानामध्ये घेतल्या जातात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रचाराकरिता अन्य पक्षांना जाहीर सभेसाठी मैदान मिळू नये म्हणून सलग तीन ते चार दिवस मैदानाची नोंदणी करण्याची रणनीती गेल्या काही वर्षांपासून राबविली जात आहे. यंदाही जाहीर सभांकरिता शिवसेनेने सलग तीन दिवस म्हणजेच 17, 18 आणि 19 फेब्रुवारी या दिवशी मैदान मिळावे म्हणून अर्ज केला आहे. तर राष्ट्रवादीने मात्र 18 फेब्रुवारीला मैदान मिळण्यासाठी अर्ज केला आहे. रस्त्यांवर चौक सभा होणार.