मुंबई । येत्या निवडणुकीत युती केल्यानंतर काय निकाल लागेल यासाठी सेना व भाजपा पक्षाने सर्वेक्षण केले आहे. शिवसेनेच्या सर्व्हेनुसार युती केल्यास पक्षाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.शिवसेनेलाही त्यांच्या सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना स्वबळावर लढली तर 30 ते 40 जागा वाढण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे.
स्वबळावर लढले तर
शिवसेना : 105 – 115,
भाजप : 60 – 80
काँग्रेस : 30 – 40
मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस : 10 पेक्षा कमी जागा
एमआयएम : 3 – 5
युतीत लढले तर
भाजप 106 जागांवर लढण्यास आग्रही,
तर शिवसेनेच्या वाट्याला 121 जागा येतील.
त्यानुसार,
शिवसेना : 80 – 90
भाजप : 50 – 60
काँग्रेस : 40 – 50
मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस : 10 पेक्षा कमी जागा
एमआयएम : 3 – 5
भाजपच्या सर्वेक्षणात काय?
भाजपने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भाजप स्वबळावर लढल्यास शंभरच्या आसपास जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अगदी कमीतकमी म्हणजे 85 जागा तरी निश्चित मिळवता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेशी जागावाटपात नमते घेऊन 100 पर्यंत जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा सरळ लढत द्यावी, असा भाजपच्या नेत्यांचा कल आहे. भाजप जर स्वबळावर लढलं नाही, तर जागावाटपात शिवसेनेचा वरचष्मा सहन करावा लागेल आणि महापौर शिवसेनेचाच स्वीकारावा लागेल, असा सूर भाजपमध्ये उमटत आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे नमते घेऊन 100 ते 105 जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा स्वबळावर लढून निवडणूक निकालानुसार सत्तेसाठीची रणनीती आखण्याचा मार्ग अधिक योग्य असल्याचं पक्षात काही नेत्यांचं आहे.