मुंबई । भारतीची वॉल म्हणजे राहुल द्रविड याने 22 जून 1996 रोजी लॉर्डसच्या मैदानात पहिला चेडू खेळला होता. इंग्लंडविरूध्दच्या दुसर्या कसोटीत सौरभ गांगुली व द्रविडने एकाचवेळी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. राहुल द्रविडने त्याच्या कारिकिर्दीत तब्बल 31258 चेंडूचा सामना केला असून, 44152 मिनिटे त्याने मैदानावर घालवली आहेत. क्रिकेटच्या इतिहासात शैलीदार संयमी खेळीला सिद्ध करून तो संघाची भिंत म्हणून ओळखला जावू लागला. तो तिन्ही प्रकारातही क्रिकेट खेळताना दिसला.