जीवनाचा जोडीदार कसा असावा ? यावर संवाद

0

शहादा । शहरात प्रथमच आपल्या जिवनाच्या जोडीदार कसा असावा? यावर संवाद करणारी एक अनोखी संवाद कार्यशाळा पालक व विवाह करु इच्छिणार्‍या तरुण तरुणीसाठी आयोजीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहादा शाखा यांच्या वतीने शहाद्यात डोंगरगाव रोडवरील कुलकर्णी हॉस्पिटल येथे आपल्या जिवनाच्या जोडीदार कसा निवडावा? याविषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .सदर कार्यशाळा ही दि 24 जुन शनिवारी सकाळी 9 ते 5 या दरम्यान होणार आहे. आजच्या काळ हा बदललेला काळ आहे आणि आत्ताच्या जीवन जगण्याची शैली ही फार जलद झाली आहे जीवन जगताना झालेल्या अनेक गोष्टीतील बदलामुळे कुटुंब व्यवस्था नातेसंबंध आणि तरूण तरुणी च्या मानसिकतेतही झालेला आहे.

वाढलेले घटस्फोटाचे व विभक्त प्रमाण
त्यातुन वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण वाढले विभक्त रहाण्याचे प्रमाण ही वाढले आहे. काही परिवारात खानदानाला जास्त महत्व दिले जाते त्यामुळे नवर्या मुलीला परिवारात कुढत बसावे लागते.कुटुंबाची ईज्जत महत्वाची मानली गेल्याने तिच्या स्वातंत्र्यवर गदा येते व त्यामुळे ती कटाळुन आत्महत्या करते असे चित्र समाजात दिसते.प्रेम आणि आकर्षण यातील फरक न समजल्याने झालेले प्रेमविवाह नंतर संकटात सापडतात मग या आयुष्याचे पुढे काय करायचे असा प्रश्न त्याच्यापुढे ठाकतो. या प्रेमविवाहामुळे बर्‍याचवेळा असे निदर्शनास येते की तीला तीच्या आई वडिलांचे दार बंद होते. इटरनेट व मोबाईल मुळे कोणीही एकमेकांच्या फार पटकन जवळ येतो यावेळी भावनेत तरुनाई वाहुन जाते व एकमेकांना शांतपणे समजुण घेणे रहावुन जाते व चुकीच्या जोडीदार निवडला जाण्याची शक्यता वाढते. या व अश्या अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी अनिस शाखा शहादा तर्फ सुसवांद कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे यासाठी पालक व तरूण मुला मुलीनी मोठ्या संख्येने हजर रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.