उमंग सृष्टी प्री. प्रायमरी स्कुल मध्ये हेल्पर प्राजेक्ट

0

चाळीसगाव । उमंग सृष्टी प्र.प्रायमरी स्कुल मध्ये हेल्पर प्राजेक्ट साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपदा पाटील होत्या. हेल्परची सुरवात प्रात्यक्षिकाद्वारे झाली. या प्रात्यक्षिकाद्वारे हेल्परची माहिती विद्यार्थ्यांना आणून दिली. हेल्परर्स हे आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावतात. व ते महत्व हेल्परची ओळख उमंग सृष्टी स्कुलमधील चिमुरड्यांनी वेशभूषा परिधान करून ओळख करून घेतली त्यानंतर सर्व हेल्पर कार्याक्रमाला हजर होते.

ते हेल्पर म्हणून पोलीस मयुरी पाटील, डॉक्टर जोती पाटील, नर्स प्रतीक्षा पाटील, केमिस्ट हरीश निकम, मिल्क मॅन प्रशांत ठाकूर, ट्राफिक पोलीस दिलीप सोनवणे, सोल्जर आहिरे, टिचर साधना पाटील, वेजिटेबल सेलर नितीन महाजन, बार्बर प्रसाद चित्ते, फार्मर भरत पाटील, टेलर आरीफभाई सय्यद, कुली राकेश बागुल, गारबेज कलेक्टर सुनील सहगिले, वॉचमन जाधव, पोस्टमन रोकडे यांनी त्यांच्या वेशभूषेत उपस्थिती दिली व त्यांची ओळख शिक्षक वर्गाने चिमुरड्यांना करून दिली. त्यानंतर चिमुरड्यांना मनोरंजनासाठी हेल्पर प्रोजेक्टसंबंधित ‘खेळ’ घेण्यात आला. त्याचा पूर्ण आनंद चिमुरड्यांनी घेतला व खेळातच चिमुरड्यांनी त्यांनी परिधान केलेल्या वेशभूषेनुसार माहिती दिली. त्यानंतर,उपस्थित सर्व हेल्परर्सचे आभार मानण्यात आले. जिनल शहा, वृषाली पाटील, वैष्णवी पवार, हेमांगी पाटील, भाग्यश्री व्यास, साधना पाटील, शेख सर, अर्जुन पाटील, मनोहर सोनवणे, भगवान बच्छे, मयूर मगर, उल्हास पाटील आदींनी यशस्वीतेसाठी कामकाज पाहिले. जिनल शहा यांनी सूत्रसंचालन केले.