36 जिल्ह्यातील पीक विमा धारकांना दिलासा

0

बोदवड : तालुक्यातील एक हजार 700 शेतकर्‍यांसह संपूर्ण महाराष्ट्रात पीक विमा धारकांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला असून पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

आमदारांच्या इशार्‍याची गंभीर दखल
शिवसेनेचे तालुका संघटक शांताराम कोळी हे गेल्या पाच महिन्यांपासून अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडिया लि.ब्रांच, मुंबई यांच्या प्रतिनिधीच्या संपर्कात होते शिवाय पीक विम्याचा लाभ होण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता मात्र पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून वेगवेगळ्या तारखा देण्यात येत असल्यातरी पीक विमा रक्कम काही मिळत नव्हती. ही बाब आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी पीक विमा कंपनीशी संपर्क साधला व शेतकर्‍यांना तातडीने पीक विम्याची रक्कम अदा करण्याच्या सूचना केल्या. बोदवड शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांनी अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडिया लि.ब्रांच, मुंबई यांना 15 जुलैपर्यंत सर्व शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. या सर्व बाबींची दखल घेत विमा कंपनीने सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. पीक विम्याची रक्कम मिळण्याकामी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, गजानन खोडके, शांताराम कोळी, कलीम शेख, हर्षल बडगुजर, संजय महाजन, दीपक माळी, भास्कर गरचळ, अमोल देशमुख, कैलास सुर्यवंशी, गोपाळ पाटील, पंकज वाघ, अमोल व्यवव्हारे, धनराज सुतार, विक्की शर्मा, बंटी पाटील, सागर काकडे, नईम बागवान, धनराज माळी, सुनील सुर्यवंशी, राजु सुर्यवंशी, निरंजन चंदनकार आदींनी परीश्रम घेतले.