कर्नाटक निवडणुकीसाठी १ वाजेपर्यंत ३६ टक्के मतदान

0

बंगळूर-कर्नाटक राज्यात विधान सभेच्या २२४ जागेपैकी २२२ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाले आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या आहे. सकाळी ९  वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झालेले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाले होते. दरम्यान आता दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३६ टक्के मतदानाची नोंद झाली आह

काही ठिकाणी ईवीएम मशीनमध्ये बिघाड झाल्चे दिसून आले. राजाजीनगर एका मतदान केंद्रावर सुरुवातीच्या काही तासातच वीज बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. बेलागवी मतदान केंद्रावर एका महिलेला बुरखा काढावे लागले त्यामुळे वाद झाला होता. मात्र हा वाद वेळीच मिटला.

आधी राष्ट्रीय कार्य मग लग्न
या ठिकाणी एका नव वधूने लग्न लागण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. अगोदर राष्ट्रीय कार्य नंतर लग्न असे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

बंगळूरच्या एका मतदान केंद्रावर कॉंग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पहावयास मिळाले.