37 वर्षीय शेतमजूर चक्कर येऊन पडला अन् प्राणाला मुकला

Manvel youth died during treatment due to vertigo यावल : तालुक्यातील मनवेल येथील एका 37 वर्षीय शेतमजूर तरूण गावात अचानक चक्कर येऊन कोसळल्याने त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात व नंतर भुसावळ ट्रामा सेंटर येथे उपचारार्थ हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपक गंगाराम काळे
(37) असे मयताचे नाव आहे.

यावल पोलिसात नोंद
दीपक हा तरुण शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता मात्र न घरी असतांना अचानक चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला व त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे त्याच्यावर प्रथम उपचार करून तातडीने ट्रामा सेंटर, भुसावळ येथे हलवण्यात आले मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रामा सेंटरच्या डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.