37 ग्राहकांच्या रक्कमेचा अपहार

0

उल्हासनगर । अंबरनाथ येथील जनलक्ष्मी फायनन्शीयल सर्वीसेस लिमिटेड या कंपनीच्या 37 ग्राहकांकडून गोळा केलेल्या 78 हजार 240 रूपयाच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात अक्षय या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल केला आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंबरनाथ पुर्व येथे जनलक्ष्मी फायनन्शीयल सर्वीसेस लिमिटेड ही कंपनी असून अक्षय(25) हा तरूण कंपनीसाठी पैसे गोळा करण्याचे काम करीत होता. त्याने गेल्या वर्षीपासून ते मार्च महिन्यापर्यंत कंपनीच्या 37 ग्राहक यांच्याकडून 78 हजार 240 रूपयाची रोख रक्कम गोळा केली होती. मात्र, ही रक्कम जनलक्ष्मी फायनन्शीयल सर्वीसेस लिमिटेड या शाखेत जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी त्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी सुनिल दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय(25) याच्याविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.हवा.ठाणगे करीत आहेत.