37 ग्रा.पं.ची दप्तर तपासणी

0

जळगाव । प्रशासकीय व्यवस्था ही सर्वसामान्य जनतेची कामे वेळेवर व योग्य प्रकारे होण्यासाठी निर्माण केलेली असल्याने प्रशासन हे लोकोपयागी, संवेदनशिल तसेच पारदर्शी असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकास करणे ही ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेची असते. त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत हा सर्वात तळाचा व लोकांचा जास्त संबंध येणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जि.प.ची असल्याने नाशिक आयुक्त यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतच्या दप्तराची तपासणी जि.प.प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. महिन्याभरात ग्रामपंचायत दप्तर तपासणी करुन अहवाल आयुक्त कार्यालयाला पाठवावे लागणार असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

या ग्रा.पं.चा समावेश
मारवड (अमळनेर), अडावद (चोपडा), पोहारे (चाळीसगाव), निंभोरा (भडगाव), शिरसाला (बोदवड), लासूर (चोपडा), गारखेडे (धरणगाव), मोहाडी (जळगाव), बेटावद (जामनेर), कासोदा (एरंडोल), सोनवद (धरणगाव), अमोदा (यावल), फुलगाव (भुसावळ), तामसवाडी (रावेर), पिंप्राळा (मुक्ताईनगर), करंजी (बोदवड), पातोंडा(अमळनेर), बहादरपूर (पारोळा), वाघाळी (चाळीसगाव), बालाड(पाचोरा), गुडदे (भडगाव), सुजदे (जळगाव), फत्तेपूर (जामनेर), पातरखेडे(एरंडोल), नारणे(धरणगाव), खडके (भुसावळ), चुचाळे(यावल), विवरे(रावेर), सारोळा (मुक्ताईनगर), धोंडखेडा (बोदवड), शिरुड (अमळनेर), महालापूर(पारोळा), हातेड (चोपडा), नेरी (पाचोरा), ओझर(चाळीसगाव), सावदे (भडगाव) आदी ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी होत आहे.

कारवाई होणार
तपासण्या वेळोवेळी काटेकोरपणे आणि योग्य प्रकारे झाल्यास भ्रष्टाचार, अनियमितता, गैरव्यवहार इत्यादींना निश्‍चितच आळा बसेल व प्रशासन सुरळीत होवून गावाचा विकासास चालना मिळू शकेल. तपासणी दरम्यान एखाद्या ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता अथवा गैरप्रकार आढळून आल्यास संबंधीत अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई होणार आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम(39) अंतर्गत ही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

मारवड सीईओंकडे
मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, सर्व उपमुख्यकार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक डीआरडीए, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांना गावे नेमून देण्यात आले असून त्यांना त्या गावाच्या ग्रामपंचायतच्या कारभराची दप्तर तपासणी करावयाची आहे. सीईओ दिवेगावकर यांच्याकडे अमळनेर तालुक्यातील मारवड ग्रामपंचायत तपासणी होती, तर अतिरिक्त सीईओ संजय म्हस्कर यांच्याकडे चोपडा तालुक्यातील अडावद ग्रामपंचायत देण्यात आली आहे.