37 वेळा रक्तदान करणार्‍या महालपुरेंचा सत्कार

0

पाचोरा । पाचोरा येथील हरिओम ड्रेसेसचे संचालक महेंद्र महालपुरे यांनी तब्बल 37 वेळा रक्तदान करुन समाजात वेगळा आदर्श निर्माण केल्याने त्यांचा वाणी युवामंच तर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरेश शिरोडे (पुणे) यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.

यावेळी गोविंद शिरोडे (पारोळा), पाचोरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शरद पाटे, डी.आर.कोतकर, चंद्रकांत कोतकर, विजय सोनजे, प्रविण वाणी सह समाजातील युवामंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.