नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार बहाल करणारे कलम 370 रद्द करण्यात आले आहे. परंतु त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती गोगोई यांनी याचिकाकर्ते अॅड. मनोहर लाल शर्मा चांगलेच फटकारले.
न्यायमूर्ती गोगोई यांनी याचिकाकर्तेे शर्मा यांना म्हणाले की, तुम्ही ही कसली याचिका दाखल केली आहे? गेल्या अर्ध्या तासापासून मी ही याचिका वाचतोय. पण मला समजले नाही की तुम्हाला काय म्हणायचे आहे. मी आत्ता तुमची ही याचिका फेटाळू शकतो. परंतु तुमच्यासोबत ज्या इतर याचिका दाखल झाल्या आहेत, त्यावरही परिणाम होईल म्हणून आम्ही तुमची याचिका तहकूब करत आहोत असे न्यायमूर्ती गोगोई म्हणाले. इतका गंभीर विषय असूनही तुम्ही इतक्या बेजबाबदारपणे याचिका कशी काय दाखल करु शकता? शर्मा यांच्या याचिकेसह एकूण सात याचिका दाखल झाल्या आहेत. सर्वच्या सर्व याचिका चुकीच्या आहेत. दरम्यान,याचिकेवरील पुढील सुनावणी केव्हा होणार, याबाबत कोर्टाने तारीख सांगितलेली नाही.