370 हटविल्यानंतर आज मोदी साधणार देशवासियांशी संवाद !

0

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा असलेला दर्जा काढून घेत केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले आहे. त्यानंतर आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देशवासियांशी संवाद साधणार आहेत. दुपारी चार वाजता ऑल इंडिया रेडिओवरून त्यांचे भाषण प्रसारित होणार आहे. यावेळी मोदी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढणे आणि विभाजनाविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहे.