योगेश्‍वर दत्तने घेतला केवळ 1 रुपयाचा शगुन

0

रोहतक : लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक जिंकणारा भारताचा मुष्टियोद्धा योगेश्‍वर दत्तचा शनिवारी साखरपुडा झाला. योगेश्वर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी राजकीय मुद्द्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे, तर कधी जवानांच्या समनार्थ केलेल्या ट्विटमुळे त्याची चर्चा होत असते. आता साखरपुड्यामुळे योगेश्‍वर दत्त पुन्हा चर्चेत आला आहे. हरियाणाचे काँग्रेस नेता जयभगवान शर्मा यांच्या मुलगी शीतल हिच्याशी योगेश्‍वर दत्तचे 16 जानेवारी होणार्‍या लग्नात त्याने 1 रुपयाचा शगुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

योगेश्‍वर-शीतल यांचा साखरपुडा
सोनीपत येथील मुरथल येथे योगेश्‍वर-शीतल यांचा शनिवारी साखरपुडा झाला. या साखरपुड्या सोहळ्याप्रसंगी योगेश्‍वर दत्त म्हणाला, मुलीच्या लग्नासाठी लागणार्‍या हुंड्याच्या पैशासाठी होणारी कुटुंबियांची धावपळ मी अनुभवली आहे. तेव्हाच मी निश्‍चय केला की, कुस्तीमध्ये नाव कमविणे आणि हुंडा न घेणे. यातील पहिले स्वप्न पूर्ण झाले असून आता दुसरा निश्‍चय पूर्ण करत आहे. याप्रसंगी योगेश्‍वरने सर्वप्रथम प्रशिक्षक सतबीर सिंह यांना अभिवादन केले. योगेश्‍वर म्हणाला, आज जर माझे वडील आणि प्रशिक्षक दोघेही जिवंत असते तर त्यांना मी केलेल्या निश्‍चयपूर्तीचा सर्वाधिक आनंद झाला असता. योगेश्‍वरची आई सुशीला देवी म्हणाल्या, लग्न समारंभ सर्वांसाठी एक खास सोहळा आहे. या सोहळ्यात एक रुपयाचा शगुन घेण्याची प्रथा सुरू व्हावी अशी योगेश्‍वरची आणि आमची इच्छा आहे.