११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविली

0

मुंबई : इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज भरण्यासाठी असलेली मुदत दोन दिवसांसाठी वाढविण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता २९ जून, २०१७ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई, अमरावती तसेच अन्य विभागांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता सोयीचे व्हावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २९ जून, २०१७ नंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज भरता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालकांनी एका निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती.