ब्राह्मण मंडळ करणार गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

भुसावळ । शुक्लयजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा बक्षिस देऊन गौरव केला जाणार आहे. 22 जुलैला तापी नगरातील हिंदू हाउसिंग सोसायटीतील सप्तश्रृंगी मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

मंडळाच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे. यामध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीका या अभ्याक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यंदा 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी गौरवासाठी पात्र धरले जाणार आहेत. सभासदांनी आपल्या पाल्यांचा अर्ज गुणपत्रिकेची प्रत गजानन जोशी (तापीनगर), अनिल हिंगवे, रामचंद्र गचके यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कागदपत्रे जमा करण्यासाठी 16 जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.