कार-अपेरिक्षा अपघातात तीन जखमी; एक गंभीर

0

भुसावळ । जळगावकडून शहरात येणारी कार अंड्यांची वाहतुक करणार्‍या अ‍ॅपेरिक्षावर आदळली असता दोन्ही वाहनांच्या चालकांसह रिक्षाचालकाच्या बाजूस बसलेल्या इसम गंभीर जखमी झाला असल्याची घटना वांजोळा रोडवरील राजस्थान मार्बलजवळ गुरुवार 29 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. शहरातील वांजोळा रोडवरील राजस्थान मार्बलकडून अंड्याने भरलेली अ‍ॅपेरिक्षा (एमएच.19 बीएम ़4081) ही अंड्याच्या गोदामातून अंडे घेऊन कासोद्याकडे जाण्यासाठी रस्त्यावर येत असताना जळगावकडून मुक्ताईनगरकडे जाणारी चारचाकी (एमएच 19 बीओ 0755) धडकल्याने अ‍ॅपेरिक्षातील चालक अब्दुल वसमी अ़मुसद्दीक (रा. भुसावळ) हा किरकोळ जखमी झाला. तर त्याच्या सोबत असलेला इरफान खान सुभान खान (रा. खडका, ता. भुसावळ) हा गंभीर जखमी झाला़. इरफानच्या एका पायास गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. तर चारचाकी चालक मारु भिका चव्हाण (रा. मुक्ताईनगर) हा किरकोळ जखमी झाला.