कल्याण – काही दिवसांपूर्वी कल्याणनजीक असलेल्या गोळीवली व आसपासच्या काही एटीएममधून 38 लाखांची रोकड लंपास झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली व त्यांचा शोध सुरू केला. मात्र तीन महिने उलटूनही फरार आरोपींचा शोध घेण्यात त्यांना यश येत नव्हते. बंगलोर येथील एक लॉजवर लपून बसलेल्या या आरोपींचा थाटमाट पाहून मालकाला संशय आला. त्याने याबाबत पोलिसांना माहिती त्यांनी या त्रिकूटला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या गुह्यांची कबुली दिली.
सीसीटीव्हीत झाली घटना कैद
यामधील मुख्य आरोपी रमेश पवार हा रायटर प्रा ली कंपनीसाठी काम करत होता या कंपनीचे सेफ गार्ड कंपनीशी टाय अप होते. ही कंपनी बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे काम करत होते. रमेश पवार याने त्याचे साथीदार नयन भानुशाली, ज्योतिष गुप्ता यांच्या मदतीने हे पैसे चोरल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये दिसून आले होते. त्याआधारे पोलिसांचा तपास सुरु होता.
मानपाडा पोलिसांची कारवाई
या तिन्ही आरोपीना मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून रमेश पवार, नयन भानुशाली, ज्योतिष गुप्ता अशी या त्रिकूटाची नावे असून भारत भ्रमण व हौस मौज करण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याची कबूल केले आहे. 16 मे रोजी गोळवलीसह आसपासच्या परिसरतील एटीएममधून 38 लाखांची चोरी झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला.