Panipuri Seller Commits Suicide In Best Town जळगाव : पाणीपुरी विक्री करून कुटुंबाला हातभार लावणार्या जळगावच्या सर्वोत्ताम नगरातील कला भवन समोरील 38 वर्षीय तरुणाने गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्लूसिंग प्रजापती कुशवाह (38, रा. कला भवन समोर, सर्वोत्तम नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कल्लूसिंग कुशवाह हा मोठा भाऊ व वहिनीसोबत सर्वोतम नगरात वास्तव्याला होता. पाणीपुरीची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करत होता. शुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कल्लूसिंगचा भाऊ हा पाणीपुरीची गाडी घेवून बाहेर निघून गेला. त्यावेळी कल्लूसिंग हा घरात एकटाच होता. राहत्या घरात त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
एमआयडीसी पोलिसात नोंद
कल्लूसिंगचा मोठा भाऊ हा काही कामानिमित्त घरी आला असता त्याला भावाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.