38 हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरून चोर फरार

0

तळोदा। येथील विद्यानगरीत घरचे गावाला गेल्याचे पाहून संधी साधत चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या प्रकार घडला आहे. यात 38 हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरून चोर फरार झाला आहे. अज्ञात व्यक्तीवर तळोदा पो.ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोदा येथील विद्यानागरी परिसरात राहणारे पनीलाल मनसाराम बागुल वय 40 किरण गॅस एजन्सी येथे गॅस वाहतूक करणाचे काम करतात.दि 20 जुलै रोजी ते त्यांच्या नातेवाईकांकडे ठाणेपाडे येथे उत्तरकार्यास गेले असल्याची संधी साधता चोरांनी रात्रीचा सुमारास मागील दरवाजा तोडून घरात शिरून रोकड 500 ग्राम चांदीचे कडे, 5 ग्राम सोन्याचे कानातील टोंगल, 3 ग्राम वजनाचे मनी मंगळसूत्र, दीड ग्राम पेंडल, व 4 हजार रु. रोख रक्कम असे एकूण 38 हजार रु. चोरी करुन फरार झल्याचे घटना घडली. त्यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.उपनिरीक्षक घोरपडे, मुकेश पवार, पो.उ.नि.आधार सोनवणे, कॉ. देविदास नाईक. आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला.