जळगाव । रेल्वे स्टेशन पोलीस चौकीला लागून रीक्षा युनियनीयचे कार्यालय थाटण्यात आले होते. या कार्यालयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. हे कार्यालय अनाधिकृत असल्याची तक्रार शहर पोलीसांनी अतिक्रमण विभागाकडे केली होती. यानुसार अतिक्रमण विभागाने हे कार्यालय हटविण्याची तयारी शनिवारी पूर्ण केली होती. मात्र, रीक्षा युनियनयचे सदस्य यांनी अतिक्रमण विभाग गाठून कार्यालय हटवू नये असे सांगितले. याला उत्तर देतांना अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी कार्यालयासाठी परवानगी घेतली आहे का याची विचारणा त्यांना केली. त्यांच्याकडे कोणतीही परवानगी आढळून आली नाही. युनीयन सदस्यांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने अतिक्रमण पथक कार्यालय हटविण्यासाठी रवाना झाले. अतिक्रमण विभागाच्या पथकाचे तीन टॅक्टरसह अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान, पथक प्रमुख अतिष राणा व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तर युनियच्या पदाधिकारीही रेल्वेस्टशेन परिसरात हजर झाले होते.
युनियनच्या पदाधिकार्यांनी घेतली भेट
यावेळी काही गोंधळ उडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमण पथक पोलीस बंदोबस्तात आल्यावर रीक्षा युनीयनच्या सदस्यांनी अतिक्रमण अधिक्षकांना भेटून स्वतःच कार्यालय काढण्याची तयारी दाखविली. अतिक्रमण पथकाने कार्यालय काढण्यास मदत त्यांना देऊ केली असता युनीयनच्या कार्यकर्त्यांनी ती नाकारली. रीक्षा युनीयन सदस्य स्वतः कार्यालय काढून घेत असतांना तेथे पथक व पोलीस लक्ष ठेवून होते. यावेळी युनीयनच्या सदस्यांनी अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून 100 फुटापर्यंत अतिक्रमण का काढत नाही अशी विचारणा केली. त्यांना हेतुपुरस्पर त्रास दिला जात असल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली. याआधीही आम्ही येथे पाणपोई लावली असता ती उचलण्यात आली असून विशिष्ट हेतूने प्रेरीत होवून ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी युनीयन सदस्य करीत होते.