बॉलीवूडमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचल्यानंतर हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप टाकण्यासाठी प्रयत्न करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हीचे लहानपणाचे किस्से आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. कालपर्यंत बॉलिवूडमध्ये काम करताना दीपिकाचे प्रथम रणवीर कपूरसोबत नाव जोडले गेले होते. त्यानंतर रणवीर सिंहसोबत नाव चर्चेला आले. मात्र, लहानपणापासून दीपिकाच्या मनामध्ये हॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार लियोनार्डो डिकेप्रियो याने घर केले होते.
दीपिकाला लियोनार्डो खूप आवडायचा. दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राफवर लहानपपणीचे काही फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये दीपिकाचे तिची लहान बहीण अनीशा हिच्या सोबत खूपच चांगले बॉन्डिंग असतांना दिसत आहे. दोघीही लियोनार्डोच्या फॅन्स होत्या. त्याचे पोस्टर्स त्यांनी त्यांच्या खोल्यांमध्ये त्या वेळी लावले होते. त्याचबरोबर टायटॅनिकचेही फोटो होते. दीपिकाने इंस्टाग्राफमध्ये एका वर्तमान पत्राच्या कात्रणाचा फोटोही शेयर केला आहे. ज्यामध्ये दीपिकाच्या आईने तिची आणि तिच्या बहिणीची खोली कशी बनवली होती, याच्या आठवणी दिसतात, जेणेकरून दोन्ही बहिणींमधील निर्माण झालेले बॉन्डिंग कायम टिकून राहील, अशी तिच्या आईची अपेक्षा होती.