ओघवत्या शैलीत रसिकांनी बाजीराव पेशवा अनुभवला

0

जळगाव : डॉ. राम आपटे प्रतिष्ठान आयोजित प्रतापसूर्य बाजीराव यांच्या 20 वर्षाच्या कारकीर्दीचा ओघवत्या,आणि आपल्या खर्जातल्या भारदस्त आवाजाने मंत्रमुग्ध करीत सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी उद्बोधक इतिहासाचे कथन कांताई सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी मंचावर मोहन कुलकर्णी,चारुदत्त गोखले उपस्थित होते.पावसाच्या सरी झेलत या कार्यक्रमाला रसिकांची असलेली उपस्थिती याबद्दल राहुल सोलापूरकर विशेष आभार मानत आपल्या व्याखानाला सुरवात केली.बाजीराव मस्तानी या संजय लीला बन्सालीच्या चित्रपटात मोहम्मद कमबख्शची भूमिका साकारण्याचा योग आला पण अपघातामुळे भूमिका साकारता आली नाही ही खंत व्यक्त केली.आणि बाजीराव यांचा लढवय्या बाजीराव त्यांचे 20 वर्षातील एकही लढाई न हरणारा व मस्तानी जीच्या सोबत फक्त 18 महिन्याचा व्यतीत केलेला कालखंड व शौर्य रसिकांच्या डोळ्यासमोर उभे केले.यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.