जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि सेटीस् विद्यापीठ मेक्सिको यांच्यात काही दिवसापूर्वी सामजस्य करार करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने उमवीचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील आणि मेक्सिको विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजच्या संचालिका दार डायना रुईज् इस्थर वुलफोक यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली व नवे प्रकल्प राबविण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली. ऑनलाईन लेक्चर, संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व शिक्षक अदान -प्रदान, संयुक्त प्रकाशन हे प्रकल्प राबविण्यात येईल अशी चर्चा या वेळी करण्यात आली.
प्राध्यापकांचे होणार अदान प्रदान,
मेक्सिको विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांना उमवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व उमवीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांना मेक्सिको विद्यापीठात मार्गदर्शन करण्यासाठी प्राचारण करण्यावर यावेळी चर्चा झाली. समर प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षी मेक्सिको येथे उमवी तसेच सलंग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठविण्याचे यावेळी ठरले. याप्रसंगी व्यवस्थापन प्रशाळेच्या संचालिका डॉ.सीमा जोशी, प्रभार कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.कर्हाड, प्रा.डी.एस.पाटील, डॉ.समीर नारखेडे आदी उपस्थित होते.