रोटरी ही एक माणसांची हेल्पलाईन होय…!

0

चोपडा । रोटरी क्लब या संस्थेने जलयुक्त शेत शिवार, विहीर पुनर्भरण कार्यक्रम हाती घेऊन शासनाला सहकार्य करावे. विहीरीचे पुनर्भरण केले तर पाण्याची पातळी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत रोटरी ही सर्वसाधारण माणसाची हेल्पलाईन असून एक समाजप्रिय संस्था असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. चोपडा येथील महिला मंडळाच्या सभागृहात आयोजित रोटरी क्लब व इनरव्हील क्लबचे नूतन अध्यक्ष, सचिवाच्या पदग्रहण सोहळ्यात बोलत होते.

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, सतीश देशमुख, राम सोमाणी, आशिष जैस्वाल, मिना अग्रवाल, मंजुषा अग्रवाल आदी होते. अध्यक्ष स्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. रोटरीचे नूतन अध्यक्ष म्हणून विलास पाटील, सचिव डॉ.केशरसिंग पाटील, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी प्रभावती पाटील, सचिव पदी अ‍ॅड.सीमा पाटील यांनी पदभार स्विकारला. यावेळी नगराध्यक्षा मनीषा चौधरी, माजी आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या निलिमा पाटील, गोरख पाटील, चंद्रहास गुजराथी, विजया पाटील, अतुल ठाकरे, इंदिरा पाटील, अ‍ॅड.जी के पाटील, वसंत गुजराथी, अ‍ॅड डी.पी.पाटील, अ‍ॅड.घनश्याम पाटील, गोकुळ पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी केले.