मुक्ताईनगर । जी.जी. खडसे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय घडवितांना आजच्या महाविद्यालयीन युवकांनी आपल्या जीवनात यश संपादन करण्यासाठी आत्मविश्वास तेवत ठेवला तरच यशाची वाट पादाक्रांत करता येईल, असे मत प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्रमुख वक्ते म्हणून खडसे महाविद्यालयाचे प्रा. ए.पी. पाटील होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत युवक दशा आणि दिशा या विषयावर मार्गदर्शन केलेे. त्यात त्यांनी आजच्या काळातील युवकांसमोरील आव्हाने व विविध क्षेत्रातील संधी या मुद्यांचा उहापोह केला. व्यासपीठावर उपप्राचार्य एस.एम. पाटील, भुगोल विभागप्रमुख प्रा. पी.पी. लढे, वनस्पती विभाग प्रमुख प्रा. एस.ए. देशमुख होते. कार्यक्रमाची सुत्रे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हाताळली. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.