– देशाच्या हितासाठी सर्वांनी वैज्ञानिक क्षेत्रात भरघोस योगदान द्यावे
– मुंबई एन.एम.आय.एम.एस. विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी साधला सुसंवाद
शिरपूर : देशाच्या हीतासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी भरघोस योगदान द्यावे. अनेक दृष्टया जागतिक क्रमवारीत भारत अग्रक्रमावर असून विद्यान व संशोधनाच्या क्षेत्रात सर्वांनी मोठे कार्य हाती घ्यावे असे आवाहन डॉ.ए.पिल्लई यांनी केले. मुंबई येथील विलेपार्ले केलवणी मंडळ संचलित एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठात ब्रह्मोस मिसाईल (क्षेपणास्त्र) चे जनक डॉ.ए.सिवाथनू पिल्लई यांनी विद्यार्थी व प्राध्यापक, ट्रस्टी यांच्याशी सुसंवाद साधून मार्गदर्शन केले.
खास आमंत्रणावरून उपस्थिती
एस.व्ही.के.एम. संस्थेचे ट्रस्टी चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी खास आमंत्रण दिल्यानुसार ब्रह्मोस मिसाईल (क्षेपणास्त्र) चे जनक शास्त्रज्ञ डॉ.ए.सिवाथनू पिल्लई यांनी मुंबई येथील एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठास भेट दिली. या दोघांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याची बाब खूपच कौतुकास्पद आहे. याप्रसंगी व्यासपीठावर ब्रह्मोस मिसाईल (क्षेपणास्त्र) चे जनक शास्त्रज्ञ डॉ.ए.सिवाथनू पिल्लई, एस.व्ही.के.एम. संस्थेचे प्रेसिडेंट अमरिशभाई पटेल, जॉईंट प्रसिडेंट भुपेशभाई पटेल, ट्रस्टी चिंतनभाई अमरिशभाई पटेल, ट्रस्टी भार्गवभाई पटेल, कुलगुरु डॉ.राजन सक्सेना, प्र.कुलगुरु शरद म्हैसकर, कर्नल श्रीकुमार, राजुभाई शहा, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश मूर्ती देऊन स्वागत
संस्थेचे प्रेसिडेंट अमरिशभाई पटेल व जॉईंट प्रेसिडेंट भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते डॉ.पिल्लई व कर्नल श्रीकुमार यांचे गणेश मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक चिंतनभाई पटेल यांनी केले.देशाच्या अतिशय महत्वाच्या व्यक्तिंमध्ये डॉ.पिल्लई यांची गणना होते. माजी राष्ट्रपती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.कलाम, विक्रम साराभाई, डॉ.सतिष धवन यांच्यासह महान शास्त्रज्ञांसोबत काम करुन देशाच्या अनेक वैज्ञानिक क्षेत्रात डॉ.पिल्लई यांचे मोठे योगदान आहे.
अनेक वैज्ञानिक दाखले
मुकेश पटेल इंजिनिअरींग कॉलेजच्या बी.जे.हॉलमध्ये त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थी, प्राध्यापक व ट्रस्टी यांच्याशी सुसंवाद साधून अनेक वैज्ञानिक दाखले दिले. विद्यार्थी व प्राध्यापकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यानंतर संस्थेचे प्रेसिडेंट अमरिशभाई पटेल, जॉईंट प्रसिडेंट भुपेशभाई पटेल, ट्रस्टी चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी आपसात बराच वेळ विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली. त्यानंतर संपूर्ण कॅम्पसची पाहणी करुन त्यांनी गौरवोद्गार काढले.