चोपडा । सातपुडा पर्वत रांगेतील गर्द वनराईमुळे या पर्वतरांगामधुन जात असतांना अंगाची थरकाप होत असे परंतु काही दिवसांपासून होत असलेल्या वृक्षाच्या कत्तलमुळे सातपुडा पर्वत रांगा ओसाड पडले आहे. सातपुड्या जवळपास 70 टक्के वृक्षांची अवैधरित्या कत्तल झाले आहे. शासनाने या वर्षात वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याभरात 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून 1 ते 7 जूलै दरम्यान जिल्ह्याभरात वृक्ष लागवड होणार आहे. एकीकडे वृक्ष लागवडीचा खटाटोप सुरु असून दुसरीकडे सातपुड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असल्याने 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्रास वृक्षतोड होत असल्याने चोपडा वनक्षत्राततील वन अधिकार्यांना नियंत्रण राखण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे. कंपार्ट न. 283 मध्ये सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे.
अधिकारी तालुक्यातीलच
चोपडा वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल व्ही.एच.पवार यांची पदोन्नती झाली असुन त्यांनी चोपडा येथेच सहाय्यक उपवनसंरक्षक म्हणून पदभार घेतला आहे. तसेच त्यांच्या जागी रुजु झालेले वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील यांनी देखील तालुक्यात वनपाल म्हणून काम पाहिले आहे. हे दोन्ही अधिकारी तालुक्याचेच रहिवासी आहेत. चोपडा रेंज मधील लासुर परीमंडळ विभागातील मराठे गावाजवळील कंर्पाट न. 283 मधील शेकडो सागवान वृक्षांची करण्यात आले आहे. अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोड सुरु आहे.
शासनाच्या प्रयत्नांवर पाणी
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एकूण भुभागाचे सपाट क्षेत्रात 33 टक्के व डोंगराळ भागात 66 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन असणे आवश्यक असल्याने गेल्या वर्षी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट शासनाने ठरविले होते. प्रत्यक्षात 2.82 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. 2 कोटी वृक्ष लागवडीचे यश लक्षात घेता राज्य शासन व वन विभागाने 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे निश्चित केले असुन त्या नुसार यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन वन विभागा मार्फत करण्यात आले. मागील वर्षी करण्यात आलेले वृक्षा रोपन हे गुर ढोरांच्या पाया खाली चेंदले गेल्याने जगु शकले नाही. त्यामुळे शासनाचे प्रयत्न वाया गेल्याचे दिसून येते.