मुंबई:- मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव अमिताभ जोशी यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव अमिताभ जोशी (महाराष्ट्र बॅच १९८८) यांची महसूल व वन विभागाच्या विशेष कार्य अधिकारी (अपिले) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी अमरावतीचे विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता (महाराष्ट्र बॅच १९९३) यांची नियुक्ती झाली आहे. महसूल व वन विभागाचे विशेष कार्याधिकारी (अपिले) व अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल (महाराष्ट्र बॅच १९८५०) यांची नियुक्ती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. तर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचेच प्रधान सचिव राजेश कुमार (महाराष्ट्र बॅच १९८८) यांची उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव (कामगार) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.