4 ऑगस्टला भुसावळात बालनाट्य स्पर्धेचे आयोजन

0

भुसावळ- बालवयातच नाटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच व्यक्तीमत्व विकासाची जडण घडण होण्याच्या उदात्त हेतूने अ.भा.मराठी नाट्य परीरषद, जळगाव शाखेच्या सहकार्याने स्नेहयात्री प्रतिष्ठान, भुसावळने भुसावळ शहर परीसरातील शालेयस्तरीय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही बालनाट्य स्पर्धा रविवार, 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या कालावधीत
भुसावळ येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात होणार आहे.

केवळ सात संघांना मिळणार प्रवेश
पाचवी ते दहावीपर्यंतच्या वयोगटातील विद्यार्थी या बालनाट्य स्पर्धेत सहभागी होवू शकतील. ही स्पर्धा एकदिवसीय असल्याने प्रथम प्रवेश अर्ज करणार्‍या सात संघांकरीताच मर्यादित आहे. स्पर्धेचे माध्यम मराठी व हिंदी असे आहे. रविवार, 4 ऑगस्टला सकाळी 10 वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल आणि रात्री आठ वाजता स्पर्धेचा समारोप व पारीतोषिक वितरण समारंभ होईल.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सांघिक आणि वैयक्तीक अशा स्वरुपाची एकूण 20 हजार रुपयांची रोख बक्षीसे दिली जातील. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसांसोबत स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या दिवशी मुलांसाठी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भुसावळ शहर परिसरातील शाळेतील अथवा संस्थेतील सांस्कृतीक विभागामार्फत नाट्यप्रयोग बसवून या स्पर्धेत सहभाग नोंदवावा व या सांस्कृतिक उपक्रमांस पाठबळ द्यावे, असे आवाहन अ.भा.मराठी नाट्य परीषद, जळगावच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर व स्नेहयात्रीचे अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी केले आहे.

यांचे स्पर्धेसाठी परीश्रम
स्पर्धेचे समन्वयक म्हणून संजीवनी यावलकर, अजय पाटील व मानसी पाटील काम पाहत आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता अ.भा.नाट्य परीषद, जळगाव शाखेचे विनोद ढगे, स्नेहयात्रीचे विश्‍वजीत घुले, प्रा.गिरीष कुळकर्णी, मुकेश खपली, मुकूंद महाजन, नारायण माळी, धनराज कुंवर, हरीष कोळी, संजय यावलकर, राजेश पाटील, प्रशांत पाटील, खुशाल निंबाळे, प्रदिप चौधरी, रोहन माळी, रितेश वानखडे, सुमित पाचपांडे, तुषार जोशी इ. मल्हार पाटील परीश्रम घेत आहेत.