विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठक
मुंबई :- नागपूर पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दि. 4 जुलै ते 20 जुलै 2018असा विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. यावेळी शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. या अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 7जुलै, आणि रविवार दि. 8 जुलै, तसेच शनिवार दि. 14जुलै, आणि रविवार दि. 15 जुलै, 2018 या दिवशी अधिवेशनाला सुट्टी असणार आहे.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. अजित पवार, जयंत पाटील,गणपतराव देशमुख उपस्थित होते. विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती माणिराव ठाकरे, मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,संसदीय कार्यमंत्री, आ. सुनिल तटकरे, आ.भाई गिरकर आ.जयंत पाटील आदी उपस्थित होते.