हैदराबाद । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महामार्गालगतची दारुची दुकाने बंद झाली होती. मात्र शहरांतून जाणारे रस्ते हे महामार्ग या व्याख्येतून वगळता येतील, असं सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट केल्यानंतर आंध्र प्रदेशातील दारूची दुकाने पुन्हा सुरू झाली होती. त्यामुळे राज्यात अवघ्या चार दिवसांत विक्रमी मद्यविक्री झाल्याचे सांगितल
न्यायालयीन निर्णयाचा परिणाम
सुमारे 200 कोटींची दारू विकली गेली असल्याचे आकडेवारी सांगते.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आंध्रप्रदेशातील दारूची दुकाने सुरू झाली. चार दिवसात झालेली दारू विक्री
पाहून आम्हीही गोंधळलेलो आहे, अशी प्रतिक्रीया उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. 200 कोटी रूपयांची दारू विक्री तेथे जास्त प्रमाणात असलेल्या दारूच्या अनधिकृत दुकानांमुळे झाली आहे, असे उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचार्यांचे म्हणणे आहे.