4 वर्षांच्या चिमुकलीवर जंगलात अत्याचार

0

दोंडाईचा। शिंदखेडा तालुक्यातील चावळदे गावातील एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अत्याचार करणार्‍या नराधमास दोंडाईचा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेतील आरोपी बद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून त्याच्या विरोधात पोलिसांनी तात्काळ खटला भरावा अशी मागणी आहे.

अत्याचारानंतर जंगलात फेकले
रविवारी रात्री चावळदे गावातील एका दुकानासमोरच्या अंगणात चिमुकली खेळत असताना, अर्जुन सुभाष मालचे ( वय 27 रा- वडदे) याने या चार वर्षीय बालिकेस खांद्यावर उचलून नेत जंगलात अज्ञातस्थळी जाऊन अमानुष बलात्कार केल्यानंतर तेथील झुडूपात फेकून दिले. काही वेळात मुलीच्या वडीलांना मुलगी दिसून येत नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी व ग्रामस्थांनी शोधाशोध केली शोध सुरु असताना चिमुकली रक्तबंबाळ स्थितीत जंगलात आढळून आली. या मुलीला रात्रीच दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉ. ललित कुमार चंद्रे यांनी बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट केले या बालिकेच्या पित्याने दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे या आरोपीवर दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस धुळे न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.