मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्तचा पहिला सिनेमा येणार आहे.’भूमी’ या त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. यानिमित्ताने संजय दत्त ट्विटरवर तब्बल 4 वर्षांनंतर सक्रिय झाला आहे. संजय दत्तने शेवटचे ट्वीट यापूर्वी 7 जुलै 2013 रोजी केले होते. तर ङ्गपोलिसगिरीफ या सिनेमाच्या वेळीही 20 मार्च 2013 रोजी त्याने ट्वीट केले होते. त्यानंतर आता चार वर्षानंतर त्याने पहिले ट्वीट करत ‘भूमी’चे पोस्टर शेअर केले आहे. ‘भूमी’चे पोस्टर संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर करण्यात आले. संजय दत्त आणि दिग्दर्शक उमंग कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्टर रिलीज केले. ‘बाबा इज बॅक’ या हॅशटॅगसोबत हे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे.