साडेचार वर्षात प्रथमच मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव मंजूर

0

नवी दिल्ली-लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मोदी सरकार विरुद्ध गेल्या साडेचार वर्षात प्रथमच अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाले आहे. बुधवारी कॉंग्रेस व तेलगु देसम पार्टीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दाखल केली. यावर शुक्रवारी चर्चा होणार आहे.

दरम्यान, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर वक्तव्य केले आहे. आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे असा दावा त्यांनी केला आहे. भाजपाच्या काही नेत्यांची आता दूध का दूध, पानी का पानी होईल, असे म्हणत संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याची टीका केली होती. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी मोदी सरकार अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे.