उष्माघाताने राज्यात ४ जणांचा मृत्यू, मराठवाड्यात २ नाशिक जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू

पुणे : राज्यात सूर्यदेव कोपले असून राज्यात विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात पुढील ४ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हात बाहेर जाऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात उष्माघाताने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील हिमायतनगर येथील एकाचा व पैठणमधील आडूळ बु. येथील तातेराव वाघ यांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील राहुरी येथील शेतकरी साहेबराव आव्हाड आणि अकोल्यात ट्रकचालक अकबर शहा मेहबूब शहा यांचा मालेगाव येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

अकोल्यात सर्वाधिक ४५.६ अंश तापमानाची नोंद अकोला ४५.६, जळगाव ४५.०, परभणी ४४.७, अमरावती ४४.६, वर्धा ४४.१, मालेगाव ४३.८, सोलापूर ४३.३, नांदेड ४३.२, बीड ४३.०, यवतमाळ ४३.०, जालना ४२.८, नागपूर ४१.७, छत्रपती संभाजीनगर ४१.८, गडचिरोली ४१.६, अहमदनगर ४१.४, बुलडाणा ४१.२, नाशिक ३८.६, पुणे ३८.०, सांगली ३७.६, ठाणे ३७.०, कोल्हापूर ३५.१, कुलाबा ३४.६.