40 लाखांची फसवणूक करणारा अटकेत

0

चिंचवड- फंड जमा झाला असून तो बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या भामट्याला पोलिासांनी गजाआड केले आहे. या भामट्याला पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. अटक कऱण्यात आलेल्या आरोपीने सांगवी येथील एका नागरिकाला 39 लाख 36 हजाऱ 304 रुपयांना गंडवले होते.

रमनकुमार झा (रा. कृष्णा गल्ली, दिल्ली) असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सांगवी येथील नागरिकाने सायबर क्राईम सेलकडे फिर्याद दिली होती. आरोपीला पुढील कारवाईसाठी सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोनव्दारे संपर्क साधून फंड जमा झाला असल्याचे सांगितले. फंड बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या बहाण्याने त्यांना रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सांगितली. पैसे जमा करूनही फंड जमा न करता त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली.