40 लाखांच्या रोकडबाबत लोहमार्ग पोलिसांना आदेशाची प्रतीक्षा

0

भुसावळ- जबलपूरहुन मुंबईत खरेदीसाठी निघालेल्या प्रवाशाची भुसावळातील लग्नाच्या वर्‍हाडाने 40 लाखांची रोकड असलेली बॅग आपली समजून उचचली होती तर भुसावळ लोहमार्ग पोलिसात धाव घेत प्रवाशाने आपबीती सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी लग्नाच्या वर्‍हाडापर्यंत पोहोचत रक्कम हस्तगत केली होती. ही रक्कम हवाल्याचा असल्याचा पोलिसांना संशय असल्याने नाशिक आयकर विभागाला पत्र देण्यात आले असून संबंधित विभागाच्या आदेशाची भुसावळ लोहमार्ग पोलिसांना प्रतीक्षा आहे. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशापर्यंत भुसावळ तहसीलच्या टे्रझरीत वा नाशिक आयकर विभागाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

बॅग सापडल्याने प्रवाशाचा जीव भांड्यात
जबलपूरचा प्रवासी राहुल जगदीश गोस्वामी (21, रा.427, मळाताल, करमचंद चौक) हा 16 मे रोजी अप 12168 वाराणसी एक्स्प्रेसने मुंबईत खरेदीसाठी निघाला होता. स्लीपर कोच क्र. एस- 4 च्या बर्थ क्रमांक 33 वर त्यास झोप लागल्यानंतर त्यास मनमाडमध्ये जाग आली तर बर्थ खाली ठेवलेली बॅग जबलपूरला लग्नाला गेलेल्या भुसावळातील वर्‍हाडाने जंक्शन आल्यानंतर गैरसमजुतीतून उचलली होती मात्र प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अवघ्या पाच तासात लोहमार्ग पोलिसांनी भुसावळातील गडकरी नगरातील निर्मल सत्यनारायण पिल्ले यांचे घर गाठून झाला प्रकार कथन करीत बॅग पंचांसमक्ष हस्तगत केली. सुदैवाने बॅगेतील रोकड ’जैसे थे’ असलीतरी या रकमेचा निश्‍चित स्त्रोताबाबत संशय असल्याने नाशिक आयकर विभागाशी संपर्क साधण्यात आला असून लेखी पत्रही देण्यात आले आहे. आयकर विभागाचे अधिकार्‍यांनी ही रोकड जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर ती नाशिक कार्यालयात जमा केली जाईल वा स्थानिक ट्रेझररी कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिल्यास त्या सूचनांचे पालन केले जाईल, असे लोहमार्ग पोलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले. दरम्यान, प्रवाशाने सोबत बाळगलेल्या रकमेचा निश्‍चित स्त्रोत व पुरावे न सादर केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.