40 वर्षीय महिलेचा विनयभंग ; जळगाव एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

molestation of woman in Jalgaon taluka : Crime against one जळगाव : शेतमजुरीसाठी शेतात गेलेल्या 40 वर्षीय महिलेशी अश्लील वर्णन करीत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी सुनील आत्माराम महाजन (शिरसोली, ता.जळगाव) याच्याविरोधात जळगाव जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेताच्या बांधावर केला विनयभंग
जळगाव तालुक्यातील एका गावातील 40 वर्षीय पीडीत महिला शेतात गेल्यानंतर शिरसोली शिवारातील एका शेतात आरोपी सुनील महाजन यांनी अश्लील वर्तन करीत महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात संशयीताविरोधात अ‍ॅट्रासिटीसह विनयभंगासचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा करीत आहेत.