Suicide of a 40-year-old married woman : Incident in Jalgaon जळगाव : 40 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संगीता उमेश मोघे (40, रा.लाकुडपेठ, शिवाजी नगर, जळगावत्र असे मृत विवाहितेचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
संगीता उमेश मोघे ह्या विवाहिता पती उमेश भास्कर मोघे यांच्यासह शिवाजी नगरातील लाकूड पेठेत दोन मुले व मुलीसह वास्तव्याला होत्या. उमेश मोघे हे बळीराम पेठेतील एका खाजगी ठिकाणी खासगी नोकरी करतात. घरात सर्व काही ठिक असतांना संगीता मोघे यांनी सोमवार, 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
पती उमेश मोघे हे घरी आल्यावर पत्नीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. शेजारचांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल सोनवणे यांनी मृत घोषीत केले. या घटनेबाबत मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पती उमेश मोघे, मुलगी यशीता, देवांश आणि माहिर हे दोन मुले असा परीवार आहे.